सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदी श्रद्धा सावंत-भोसले विजयी…
सावंतवाडी नगरपरिषद येथील नगराध्यक्ष पदी भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले या 745 मतांनी विजयी झाल्या आहेत तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या नीता कवीटकर व ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना पराभव सहन करावा लागला आहे
कणकवली नगरपंचायत,वेंगुर्ला नगरपरिषद,सावंतवाडी नगरपरिषद,मालवण नगरपंचायत चारही नगराध्यक्ष विजयी उमेदवार..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी संदेश पारकर 150 मताने विजयी शहरविकास आघाडी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले भाजपा :1364 विजयी मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर शिंदे सेना — 1300 मतांनी विजयी वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिराप भाजपा — 430 मतांनी विजयी
सावंतवाडी नगरपालिका निवडणूक अपडेट भाजप आघाडीवर
सावंतवाडी प्रतिनिधी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेचा निकाल मोजणीस सुरुवात झाली असून भाजप चे 5 उमेदवार आघाडीवर आहेत तर नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार श्रद्धा राजे भोसले आघाडीवर आहेत
खासदार नारायण राणेंचे एक मागणी पत्र;सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर
खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आहे ५ जी नेटवर्कचा विस्तार कणकवली प्रतिनिधी भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून या मंजुरीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात देवगड तालुक्यातील हिंडळे, कुणकवन, महाळुंगे,मोंड,…
सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना.
मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र सावंतवाडी : सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ही…
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर झळकणार.!- पालकमंत्री नितेश राणे
पारपोलीत ‘ट्री हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’ चे शानदार उद्घाटन..! सावंतवाडी प्रतिनिधी “पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले. पारपोली येथील ट्री-हाऊस आणि फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या भागाचा…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ रोजी कुडाळ येथे बैठक
शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ डिसेंबर रोजी…
शिरशिंगे येथे काजू बागायतीला भीषण आग
धोंड कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान;नुकसानीचा पंचनामा व्हावा सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास काजू बागायतीला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंकुश रामा धोंड, रमेश रामा धोंड आणि सुरेश रामा धोंड यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने धोंड कुटुंबियांचा हाताशी आलेला घास हिरावला गेला असून परिसरात…
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
कासार्डे येथील 19 वर्षीय युवती. कु. कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात
रविवार दिनांक २१ डिसेंबर ४ वाजता कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक कणकवली प्रतिनिधी येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कु. कस्तुरी पाताडे व त्यानंतर हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मयताच्या नातेवाहीकांना दिलेली उद्धट वागणूक व त्यानंतर घडलेल्या उस्फूर्त जन उद्रेक, हाॅस्पिटलची किरको॓ळ तोडफोड. नंतर तोडफोडी विरोधात जिल्हाभरातील खाजगी डाॅक्टरांनी निषेध करत…
