कुडाळ प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघामध्ये शैक्षणिक उपक्रमांतुन सातत्य राखले जाते अशा उपक्रमांतुन आपला हक्काचा आमदार म्हणून वैभव नाईक यांची लोकप्रियता वाढली आहे असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काढले,
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून वालावल हायस्कूल,चेंदवण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम श्री पडते यांच्या हस्ते झाले यावेळी श्री पडते बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले आम नाईक हे दहा वर्षे आमदार म्हणून सतत जनतेमध्ये राहुन जनसेवा, शैक्षणिक उपक्रम, विकासाची कामे करत असताना शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देऊन दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवतात त्यामुळे आपल्या लाडक्या व्यक्ती कडुन असा उपक्रम केला जात असल्याने आम नाईक आपला माणुस ही भावना निर्माण झाली आहे असेही श्री पडते यांनी सांगितले,
यावेळी माजी पंचायत समिती श्री अतुल बंगे, शिवसेना नेरुर उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर, वालावल चे युवा नेतृत्व श्री सागर पाटकर,दादु कोळंबकर, सुनील नेरुरकर, गोविंद पेडणेकर, विलास चौधरी, वालावल सोसायटी चेअरमन राजन वालावलकर, युवा सैनिक हेमंत वालावलकर, श्री घारे, श्री आडेकर व शिक्षक उपस्थित होते तर चेंदवण मधील जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब धुरी, शाखाप्रमुख किरण कोचरेकर, भालचंद्र रेवंडकर,बाळु कांबळी, मंगेश बांदेकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते