सावंतवाडी प्रतिनिधी
येथील दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव – २०२४’ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत, दीपक भाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, अर्चित पोकळे, सुरेंद्र बांदेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर तसेच इनरव्हील क्लबच्या डॉ. सुमेधा धुरी – नाईक, रिया रेडीज, देवता हावळ, सायली होडावडेकर, शर्वरी धारगळकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात लोककला, संगीत, स्थानिक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध वस्तुंना बाजारपेठ मिळवून देणारे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल महोत्सवात असणार आहेत. २९ डिसेंबर २०२४ ला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रात्री ‘साज-द-संगीत’ हा कार्यक्रम होणार आहे. याला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम धनश्री कोरगावकर प्रमुख उपस्थित राहणार आहे. तसेच ३० डिसेंबरला ६ वाजल्यापासून ‘ब्युटी कॉन्टेस्ट ‘मिस सावंतवाडी’ ही स्पर्धा होणार आहे. ३१ डिसेंबरला आवाज आर्ट इव्हेंट निर्मित ”बेधुंद २०२५” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याला सुप्रसिद्ध वादक शैलेश पाटोळे उपस्थित राहणार आहे. इंडियन आयडॉल फेम राहुल खरे, सुर नवा ध्यास नवा महाविजेती सन्मिता धापटे शिंदे, सारेगम मराठी फेम ब्रम्हानंदा पाटणकर, गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर यासह झी मराठी ड्रामा ज्युनिअर फेम कलाकार मनमोहक कला सादर कराणर आहेत. तसेच २० जणांचा समुह नृत्य सादर केला जाणार आहे. १ जाने.२०२५ ला रात्री ८ ला. श्री संगीत सद्गुरू सांस्कृतिक मंडळाचा सुश्राव्य संगीत कार्यक्रमान महोत्सवाचा समारोप होणार आहे.
दरम्यान खवय्यांसाठी विविध प्रकारचे फूड स्टॉल्स देखील लावण्यात येणार आहेत. यासाठी अर्चित पोकळे (9767150790), सुजित कोरगावकर (9423302204), प्रतीक बांदेकर (8983767353), डॉ. सुमेधा धुरी (9405813926), रिया रेडीज (9422076721) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.