जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….
सावंतवाडी प्रतिनिधीजिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर, रफत शेख आणि सुजाता पंडित यांच्या संघाने १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकवून विभागीय फेरीत प्रवेश केला. तसेच मुलांच्या गटातून नववीतील अद्वय देशपांडे यानेही विभागीय फेरीत स्थान मिळवले.विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर…