विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे
जिल्हा बँकेच्यावतीने ना.नितेश राणे यांचा ओरोस येथे भव्य सत्कार समारंभ
सिंधुनगरी(प्रतिनिधी) आपल्या प्रेमाने,विश्वासाने जी जबाबदारी आपण माझ्यावर दिली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही संकल्प समोर आहेत, काही अपेक्षा आहेत त्या पुर्ण करण्याची मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे. जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी काम करणार असून जिल्हाच्या विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेशजी राणे यांनी केले. जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
या सत्कार सभारंभात महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांनी शाल, पुष्पगुच्छ व प्रतिकचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच उपस्थित जिल्हा बँकेच्या संचालक, तसेच विविध संस्थांच्या पदाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर संचालक गजानन गावडे, व्हीक्टर डान्टस, श्री. नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश बोडस, गणपत देसाई, विठ्ठल देसाई, विद्याधर परब, दिलीप रावराणे, श्रीम.प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगांवकर, मेघनाद धुरी, महेश सारंग, संदिप परब, समीर सावंत, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.