योगेश धुरी:चोरांचा छडा लावण्यास पोलीस प्रशासन अपयशी,आजपर्यंतच्या कारकिर्दीतील माणगाव काळातील सर्वात मोठी धाडसी चोरी…
कुडाळ (माणगाव)
माणगाव खोऱ्यातील माणगाव येथील धरणवाडीत रुपेश धारगळकर यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली. चोरट्यांनी दाग दागिने सकट नगद रक्कम देखील चोरली आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप चोरांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप कुडाळ युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केलाय.
श्री. धुरी पुढे म्हणाले, तसं पाहायला गेलं तर चोर न मिळाल्याने पोलीस तपास बंद करण्याच्या मार्गावर आहेत. माणगाव सारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीने चोरी होणे आणि त्या चोरी मधील आरोपीं न मिळणे हे पोलिसांसाठी भूषणावह नाही. आम्ही पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती करीत आहोत चोर लवकरात लवकर पकडण्यात यावेत तसेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून फिर्यादी ना त्यांच्या वस्तू परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कार्य कुशल आहे याआधी देखील त्यांनी अनेक चोरी प्रकरणातील आरोपी पकडून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल.