१४ एप्रिल कणकवली येथे फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी विषयावर मोफत मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी)संकल्प प्रतिष्ठान द्वारा फणस लागवड व प्रक्रिया एक उद्योगसंधी या विषयावर रविवार १४ एप्रिल, रोजी कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील सुमधुर फळं ही निसर्गाने दिलेली देणगीच होय. त्यापैकीच एक फणस होय. कोकणात फणस मुबलक प्रमाणात असून त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास फणस एक…