महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणार
सौ.अर्चनाताई घारे यांनी जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला भेट दिली. सावंतवाडी प्रतिनिधीआरोंदा येथील सामाईक सुविधा केंद्र अंतर्गत जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट देत केंद्राच्या महिला भगिनींसह संवाद साधला. त्यांच्याकडून काजू प्रक्रिया युनिटच्या कामाची माहीती यावेळी घेतली. महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनाला राज्यातील…