शांततेच्या आंदोलनात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले तर जेलभरो आंदोलन करू!

मा.आ.वैभव नाईक,परशुराम उपरकर, अमित सामंत, सुशांत नाईक, धीरज परब यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आहेत.परंतु जमावबंदी सारख्या कलमाचा वापर करून जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. आंदोलन दडपण्याची सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेली भूमिका पोलीस घेत आहेत….

Read More

“राम कृष्ण हरीच्या जयघोषात वझरेहून (दोडामार्ग) पंढरपूरकडे वारकऱ्यांचे प्रस्थान

भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदिकाताई परब यांची उपस्थिती दोडामार्ग, प्रतिनिधी “राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल…” या अखंड नामघोषाने भक्तिमय वातावरणात वझरे येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या मंगलप्रसंगी भाजप युवा नेते विशालजी परब आणि सौ. वेदिकाताई परब यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे दर्शन घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी…

Read More

सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; मंत्री नितेश राणे यांच्या कार्यक्षमतेची महाराष्ट्राला प्रचिती महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामध्ये झाले…

Read More

कोकणवासीयांना दिलासा; एका दिवसात प्रश्न मार्गी लावल्याबद्दल देवाभाऊ,रवीदादा आणि विशेष नितेशजी राणे यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या तात्काळ हस्तक्षेपाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर केले. याचबरोबर मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस…

Read More

आंबोलीत वीज व मोबाईल सेवा ठप्प;ओटीपीअभावी गॅस वितरण खोळंबले,ग्रामस्थांची मोठी गैरसोय

पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी तातडीने लक्ष द्यावे:सौ.सावित्री पालेकर आंबोली प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे आंबोली परिसरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या सात-आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी ग्रामस्थांचे मोबाईल बंद पडले असून अनेक ठिकाणी मोबाईल टॉवरही कार्यरत नसल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. याचा फटका घरगुती गॅस वितरणालाही बसत असून, ओटीपी प्राप्त होत नसल्यामुळे गॅस एजन्स्यांकडून सिलिंडरचे…

Read More

पशु पैदास केंद्र निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेली ५ ते ६ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड?

अधिकाऱ्यांच्या संगणमताने वृक्षतोड;ग्रामस्थांचा गंभीर आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष: वृक्षतोडीसाठी आवश्यक त्या परवानगी घेण्यात आल्या होत्या का? मात्र वनविभाग सुशेगाद कुडाळ (निळेली) कुडाळ तालुक्यातील पशु पैदास केंद्र, निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साग, खैर, कीनळ, आकेशिया आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड झाल्याचा गंभीर ग्रामस्थांकडून केला जात आहे. वृक्षतोडीसाठी मात्र संबंधित आवश्यक त्या परवानग्या…

Read More

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक;शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेतील यश; ११ जुलै रोजी अहमदाबाद येथे होणार राष्ट्रीय अंतिम फेरी सावंतवाडी प्रतिनिधी फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ११ जुलै २०२६ रोजी अहमदाबाद येथील एल. एम. कॉलेज ऑफ फार्मसी…

Read More

जिल्हा परिषदेकडील कंत्राटी आउटसोर्स ड्रायव्हर पुरवठा कामात मोठा गैरव्यवहार

मंजूर निविदा 30 हजारांची…मात्र कर्मचाऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पगार फक्त 14 हजार रुपये..! ” कंत्राटी कर्मचारी उपाशी.. अन ठेकेदार मात्र तुपाशी ” ठेकेदार जिल्हा परिषदेचे जावई लागून गेलेत का? सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा संतप्त सवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील कार्यरत कंत्राटी वाहन चालक व लॅब टेक्निशियन पुरवठा टेंडर संशयाच्या भोवऱ्यात असून त्यात जिल्हा परिषदेची अक्षरशः…

Read More

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण व पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. *यावेळी भाजप…

Read More

You cannot copy content of this page