महावितरण ने विजवाहक खांब तात्काळ दुरुस्त करून बदलून द्यावे विशाल परब
सावंतवाडी (प्रतिनिधी) ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण चे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. महावितरणचे अधिकारी तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक जनतेच्या वतीने…