सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार:आदित्य ठाकरे
मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त नेतृत्वाखाली काम करीत आहे असे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी सांगितले
युवासेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदीच्छा भेट आज युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली भेट मुंबई येथे घेतली यावेळी गुहागर चे आमदार भास्करराव जाधव, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेनेचे अमित राणे युवासेनेचे राजु गवंडे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख गुरु गडकर आदी उपस्थित होते
यावेळी मंदार शिरसाट यांनी युवासेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेच्या कामाचा आढावा देऊन मा आमदार वैभव नाईक यांचा परभव तेवढाच जिव्हारी लागला असुन जिल्ह्य़ातील शिवसेना पक्ष वाढिसाठी मा आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या संघर्षांतुन युवासेनेला पाठबळ देऊन मतदारसंघातील लोकप्रियता आणि दांडगा जनसंपर्क तसेच विकास मोठ्या प्रमाणात होऊनही पराभव झाला ही खंतही युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी बोलुन दाखवली तरीही युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुढच्या काळात जोमाने करा अशा सुचना श्री ठाकरे यांनी दिल्या