वेंगुर्ला प्रतिनिधी
५२ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटातील विज्ञान प्रतिकृती मध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक आला.
दिनांक १० व ११ डिसेंबर या कालावधीमध्ये वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक विभागात ४८ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या. या प्रतिकृतींमध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली सौर ट्रॅकर प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक आला.
या प्रतिकृती साठी केंद्रामुख्याध्यापक अजित तांबे, उपशिक्षक पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल व्यवस्थापन समिती व इतर समिती अध्यक्ष व सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.