महावितरण ने विजवाहक खांब तात्काळ दुरुस्त करून बदलून द्यावे विशाल परब

सावंतवाडी (प्रतिनिधी)

ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण चे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.

महावितरणचे अधिकारी तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक जनतेच्या वतीने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या बैठकीला उपस्थित राहून विशाल परब यांनी वारंवार होणारा विस्कळीत वीज पुरवठा, सर्वसामान्यांच्या तक्रारी आणि महावितरण चा भोंगळ कारभार याबाबत तीव्र निषेध नोंदविला.

” आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेकदा पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर महावितरण ने तात्काळ वीजवाहक खांब दुरुस्ती तसेच बदलण्याच्या दृष्टीने काम करावे”, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली आहे.

प्रसंगी भाजपा विधानसभा अध्यक्ष राजन तेली, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी जी. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शेखर गावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विलास जाधव, सुरेश भोगटे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, पत्रकार सिताराम गावडे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, प्रसन्ना गोंदावळे, राजू तावडे, बाळा बोर्डेकर, महेश खानोलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page