कै.महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष गोठण विजेता

बाबा ११ उपविजेता तर पारिजात व प़ढरीचा पांडुरंग तृतीय.. संदिप सावंत मीत्र मंडळ गोठण व मधलाआवाट खासकीलवाडा मंडळाचा उपक्रम.. सावंतवाडी प्रतिनिधी कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ संदिप सावंत मीत्र मंडळ व मधलाआवाट खासकीलवाडा आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे विजेते पद महापुरुष गोठण संघाने तर उपविजेतेपद बाबा ११संघाने पटकावले.. राजाराम गवस यानी उत्कृष्ट…

Read More

महेंद्रा ॲकेडमीच्या मंदार राणेची जिल्हा न्यायालयाच्या क्लार्कपदी निवड

सावंतवाडी प्रतिनिधी येथील महेंद्रा ॲकेडमीचा विद्यार्थी मंदार राणे याची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या जूनिअर क्लार्कपदी निवड झाली आहे. राणे याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे त्याचे वडील बोअरवेल्स खोदाईचे काम करतात, अशा परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले असून त्याच्या या यशाबद्दल महेंद्रा अॅकेडमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर यांनी अभिनंदन केले

Read More

बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या नोंदविणार निषेध..

जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांचे आवाहन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दि.९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी यांना…

Read More

कर्नाटक शासनाच्या दडपशाहीला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात केला निषेध…

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नसंदर्भात बेळगाव येथे उद्या सोमवारी अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनावर कर्नाटक शासनाने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने बंदी आणली आहे. तसेच महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी आणण्यात आली आहे. कर्नाटक शासनाच्या या दडपशाहीचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात…

Read More

माहीम विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.महेश सावंत यांची समीर परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

आमदार महेश सावंत यांचे औक्षण करून करण्यात आले स्वागत.. वेंगुर्ला प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तथा माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा श्री.महेश सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोंड गावी ता.वेंगुर्ला दौऱ्यावर आले असताना आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्या होडावडा गावातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी वडील गोविंद परब,स्वरा परब…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना ही आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करीत आहे;युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार:आदित्य ठाकरे मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त नेतृत्वाखाली काम करीत आहे असे प्रतिपादन युवासेना…

Read More

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

कणकवली प्रतिनिधी हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला. संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले…

Read More

दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:आमदार नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितेश…

Read More

राज्य उत्पादन शुल्कची जुना बांदा पत्रादेवी रोडवर कारवाई..!

दारूसह १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त… बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाची गाडी असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री ९…

Read More

११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन.. वैभववाडी प्रतिनिधी दि.११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी…

Read More

You cannot copy content of this page