खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या कामांची स्पर्धा कोणी करु शकत नाही: महीला नेत्या श्रेया परब

जे काळ्या काचीच्या गाडीतुन उतरत नाही ते आता मोठ्या बडाय्या मारत फिरत आहेत:सौ मथुरा राऊळ

खासदार विनायक राऊत यांना हुमरमळा वालावल गावातुन मताधिक्य देणार,! महीलांचा निर्धार!

कुडाळ (प्रतिनिधी)

खासदार विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारार्थ कुडाळ तालुका शिवसेना महीला पदाधिकारी यांनी नेरुर, वालावल,चेंदवण,कवठी,हुमरमळा असा संपर्क दौरा केला यावेळी आज हुमरमळा वालावल येथे सौ अर्चना बंगे यांच्या निवासस्थानी महीलांची खळा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महीला नेत्या सौ श्रेया परब, कुडाळ तालुका शिवसेना संघटक सौ मथुरा राऊळ,हुमरमळा माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर यांनी मार्गदर्शन केले,
खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या विकासकामांची स्पर्धा कोणी करुच शकत नाही असे सांगून सौ परब म्हणाल्या खासदार विनायक राऊत वडील धारी तर आमदार वैभव नाईक हे भावा प्रमाणे वागणुक देत असुन सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत असे सांगुन पुढच्या काळात खासदार विनायक राऊत हेच लोकसभेत पाहिजेत असे सौ मथुरा राऊळ यांनी सांगुन आमचे नेतृत्व हे सर्व सामान्य जनतेत मिसळणारे नेतृत्व आहे असेही सौ राऊळ म्हणाले खासदार विनायक राऊत यांना भरपूर मतदान करुन हुमरमळा वासीय विकासाला मतदान चे करणार असेही महीलांनी सांगितले,
यावेळी कुडाळ तालुका महीला पदाधिकारी सौ तेजस्वी परब, कुडाळ शिवसेना शहर उपशहरप्रमुख सौ दुर्वा गवाणकर,माजी सरपंच सौ अर्चना बंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रेणुका परब, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर,सौ प्रतीक्षा परब, वैशाली पेडणेकर,पुजा मांजरेकर,सौ रुपाली परब,गिरीजा गुंजकर,दर्शना मार्गी, प्रतिभा मार्गी,रजनी परब, रश्मी परब,अमिशा केसरकर,मनाली पेडणेकर, साक्षी साळगावकर,मनिषा मार्गी,सुष्मा वालावलकर,अंकिता परब,हेमलता परब,गौरी गुंजकर,सुजा गुंजकर ,विजया राणे,व उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page