बांदा केंद्र शाळेचे दुर्वा नाटेकर अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम.‌.

बांदा (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२३-२४ या स्पर्धा परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७६गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेला बांदा केंद्रशाळेतील सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना बसण्याची संधी प्राप्त झाली होती. बांदा प्रशालेतील जे विद्यार्थी चौथी व सातवी इयत्तेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक जे.डी पाटील एक हजार रूपयांचे बक्षीस पुरस्कृत केले असून या बक्षीसाची मानकरी दुर्वा नाटेकर ही ठरली असून तिला ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. दुर्वाला वर्गशिक्षिका सपना गायकवाड, शांताराम असनकर, उर्मिला मोर्ये, स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, जे.डी. पाटील, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे, फ्रान्सिस फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. दुर्वाने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page