मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ येथे केला सत्कार..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
पुणे येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून पसार झालेल्या तिघा दरोडेखोरांना आंबोलीत जेरबंद करणाऱ्या पोलिसांचा सन्मान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, आबा पिळणकर, अमोल धुरी, प्रशांत धुमाळे, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे यांनी शनिवारी स्वतःच्या जीवावर उदार होत प्रसंगावधान राखत पुण्यातील तिघा अट्टल दरोडेखोराना जेरबंद केले होते.
संवाद मीडियावरील पोर्टल बातमीची दखल घेत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ येथील मंदिरात धाडसी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सावंतवाडीचे तहसीलदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.