गावागावातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे भाजपाचे व्हिजन..!

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट# लॅपटॉप, फ्लोमीटर सारखे आवश्यक साहित्यही केले प्रदान..!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम बनवण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न चालवले आहेत. दोडामार्गच्या आरोग्य यंत्रणेला सुसज्ज करण्यासाठी त्यांनी दिलेल्या निधीतून लवकरच इथली आरोग्य यंत्रणा कात टाकताना दिसेल. इथल्या नागरिकांना आजवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले हे वास्तव आहे, मात्र यापुढे हे प्रश्न कायमस्वरूपी संपवण्याचे व्हिजन घेऊन भाजपाचे काम पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चाललेले आहे. आपल्या सर्वांच्या सहयोगातूनही आपल्यासाठीची आरोग्ययंत्रणा सक्षम राहील यासाठी भाजपाचे सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत. तरीही, काही अडीअडचणीच्या प्रसंगी जिथे माझी गरज भासेल, मी सदैव तुमच्यासोबत असेन, असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब म्हणाले. साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तिथल्या अडचणी समजावुन घेतल्यावर ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून यापूर्वी टेली-मेडिसिन हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याची सुरुवात कोकणात झाली असून अनेक रुग्णांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. एक धाव आरोग्य मैत्रीसाठी यासारख्या कार्यक्रमातून त्यांनी आरोग्य प्रबोधनासाठी आश्वासक पाऊल उचलले आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आदर्शवत असून आपला सर्वांचा सहयोग असेल तर आरोग्य यंत्रणा पुन्हा कात टाकुन झळाळून उठू शकते. या केंद्रात ऍम्ब्युलन्सचा ड्रायव्हर रजेवर असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. मात्र हे केंद्र १०८ सर्व्हिसशी नोंदणीकृत असल्याने तूर्तास यावर मार्ग काढता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न करु असेही ते म्हणाले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार अधिक जनताभिमुख व्हावा अशा सूचना त्यांनी इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या. साटेली भेडशी आरोग्य केंद्र सक्षम व्हावे यासाठी विशाल परब यांनी आपल्याकडून स्वखर्चाने केंद्राला लॅपटॉप, फ्लो मीटर सारखे आवश्यक साहित्यदेखील यावेळी प्रदान केले.

विशाल परब यांच्यासमवेत या भेटीच्या वेळी एडवोकेट निरवडेकर सर चेतन चव्हाण साहेब नगराध्यक्ष दोडामार्ग संजय सातार्डेकर अमित सडेकर.दीपिका मयेकर माजी सभापती युवा मोर्चा सदस्य दीपक गवस समीर रेडकर, शानी बोर्डेकर.बाळू गवस प्रवीण गवस बोर्डीकर माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस शिरीष नाईक, खोकरलचे सरपंच देवेंद्र शेटकर, विशाल चव्हाण आदी मान्यवर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page