वेंगुर्ल्यातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात ९ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रोजी रंगणार संगीत भजन स्पर्धा..

युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्यावतीने करण्यात आले आयोजन..

वेंगुर्ले (प्रतिनिधी)
युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित दि. ९ व १० ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ला येथील श्री. देव रामेश्वर मंदिरात सिधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मंडळांची संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १० हजार रुपये तर उत्तेजनार्थ ५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट हार्मोनिअम, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस आणि शिस्तबद्ध संघ अशीही पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी सायंकाळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते होणार असून यावेळी ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा, संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परूळेकर, प्रसिद्ध गायीका अनघा गोगटे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत परब, वेंगुर्ला पोलिस निरिक्षक संदिप भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. भजन प्रेमींनी या भजनांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक भटवाडी मित्रमंडळ व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि मानकरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page