कुडाळ प्रतिनिधी
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने’आपला दवाखाना’ योजना सुरु करण्यात आली. मात्र, पावसाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धादांत खोटे बोलले असून कुडाळ बाजारपेठेतील “आपला दवाखाना” बंद असल्याचे शिवसेना उबाठा गटाने समोर आणले आले आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, कृष्णा धुरी, राजू गवंडे, अतुल बंगे, राजू गवंडे, गुरुनाथ गडकर आदींनी कुडाळ शहरालगत असलेल्या “आपला दवाखाना” येथे जात दवाखान्याला टाळे असल्याचे वास्तव समोर आणले.
पावसाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी स्वर्गीय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना जिल्ह्यात ठीकठिकाणी उभारण्यात आले आहेत हे सुरु आहेत का असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी सर्वच दवाखाने सुरु असल्याची माहिती सभागृहात दिली होती. यावर सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कुडाळ शहरातील आपला दवाखान्याला भेट देण्यात आली. यावेळी या दवाखान्याला कुलूप असल्याचे समोर आले. तर या दवाखान्याला कोणतीही वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव ठाकरे गटाच्या वतीने समोर आणण्यात आले.
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी महायुती
सरकारवर आरोप करत शिंदे गटाने बाळासाहेबांचं नाव चोरले
केलं आहे, शाळेची रिकामी इमारत मिळाली तिला रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, माञ बाळासाहेब ठाकरेंवर आपलं प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी सर्वत्र दवाखाने सुरु केले, मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही फसवण्याचं काम शिंदे गटाने केला असल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला आहे.
