सावंतवाडी प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या १६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे.
दुपारी ३ वाजता सावंतवाडी, गांधी चौक येथे ही जाहीर सभा होणार आहे. नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा येथे झाली होती. यानंतर सावंतवाडीत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.