सावंतवाडी प्रतिनिधी
कोलगांव येथे श्री देवी सातेरी पाडली उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उपस्थिती दर्शवली. प्रसंगी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसेच येत्या काळात त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. समवेत चंदन धुरी, विरेंद्र धुरी, रामदास बावकर, अशोक धुरी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.