सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर वार्षिक जत्रौत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमास आज महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीयुवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव दाळकर यांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी तळवडे ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
तसेच याप्रसंगी उपस्थितांशी त्यांनी आपुलकीचा संवाद साधला. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना असे कार्यक्रम खऱ्या अर्थानं मनाला आत्मिक समाधान देणारे असतात. निमंत्रित केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार देखील युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. तसेच तमाम कोकणवासी यांना सुख-समृद्धी आणि निरामय आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना देखील केली.
यावेळी देवस्थानचे बंड्या परब यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.