सिंधुदुर्ग प्रतिनिधी
प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम नुसार जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून २०२४ पासून बंधनकारक करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम २००९ तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहे.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन (NDLM) भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म मृत्यु नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तातंरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीमध्ये संबधित पशुधनाची प्रजनन आरोग्य मालकी हक्क, जन्म मृत्यु, ई सर्व माहीती उपलब्ध होते. त्याकरीता सर्व पशुधनास कानात Tag (बिल्ला) लावुन त्यांची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास कानात Tag (बिल्ला) लावुन त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोदणी प्रक्रिया सुरु आहे.
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहीती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणे करुन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरीता तसेच प्राण्यामधील संक्रमण व सांगसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.