सावंतवाडी तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी ऋतिक परब.

सावंतवाडी (प्रतिनिधी)*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांनी नवीन पदनियुक्ती जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय आणि विद्यार्थी क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत ऋतिक परब यांची सावंतवाडी तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि नियुक्ती पत्र देखील देण्यात आले,यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधासाठी भविष्यात विविध प्रकारचे धोरण राबविण्याची भावना यावेळी व्यक्त केली.

विद्यार्थी संघटन व वाढीसाठी तसेच स्थानिक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ऋतिक जोमाने काम करेल असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर नियुक्ती प्रसंगी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक,सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच सूरज खान, जउर खान,जॉनी फर्नाडिस, काशिनाथ दुभाषी, इफ्तिखार राजगुरू आणि महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी आदी उपस्थित होते.

Like

Comment

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page