तहसीलदार वीरसिंग वसावे:पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती बाबत सर्व विभागाने सतर्क करावे
माणगाव (प्रतिनिधी)
माणगाव खोऱ्यात आज मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असून आंबेरी पुलावर पाणी आल्याने अनेक नागरिक त्यात अडकून पडले आहेत असा मेसेज कुडाळ तहसीलदार आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळतात सर्व शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी लगेचच आंबेरी येथे आपल्या फौजफाट्यासह हजेरी लावली. माणगाव आंबेरी येथे आज कुडाळ तहसीलदार कार्यालय मार्फत आपत्ती व्यवस्थापन तर्फे रंगीत तालीम पार पडली. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी उपस्थित सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात अचानक एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपण सतर्क राहून कशाप्रकारे मदत यंत्रणा राबवावी याबाबत माहिती दिली. आणि येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती बाबत सर्व विभागांनी सतर्क राहावे अशा सूचनाही दिल्या. माणगाव आंबेरी येथे आज आपत्ती व्यवस्थापना निमित्त कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव ,महसूल चे नायब तहसीलदार संजय गवस, वाडोस सरपंच सौ.संजना म्हाडगुत,आंबेरी पोलीस पाटील संतोष म्हाडगुत ,कोतवाल समीर तातवडे, माणगाव पोलीस दुरुक्षेत्राचे पोलीस हवालदार सखाराम भोई, आरोग्य अधिकारी डॉक्टर शिल्पा पाटील, सार्वजनिक बांधकाम चे गोठोस्कर, कुडाळ अग्निशामक दलाचे तडवी, ग्रामसेवक कसालकर तलाठी विश्वास शेणवी ,मनीषा चिंपुगडे, मंडल अधिकारी आनंद नार्वेकर, वीज वितरण चे सहाय्यक अभियंता शेळके आदी उपस्थित होते यावेळी येणाऱ्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत तहसीलदार वसावे यांच्याकडून उपस्थित मार्गदर्शन शासकीय यंत्रणा यांना मार्गदर्शन करण्यात आले.