कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ ते नेरुर चेंदवण कवठी रस्ता साईड पट्टी,खड्डे पडल्याने अपघात होत आहेत याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीम शेलटकर यांच्या कडे निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शिष्टमंडळासहीत केली
नेरुर कवठी रस्ता आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजुर होऊन पुर्ण झाला होता परंतु रस्ता पुर्ण झाल्यानंतर रस्ता साईडपट्टी व डागडुजी देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असुन आता पावसाळा आला असुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम गंभीर दखल घेऊन डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, नेरूर जि प शिवसेना उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर,चेदवण शिवसेनेचे बाळासाहेब धुरी आदी उपस्थित होते