सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट जाहीर…
सिंधुदुर्ग प्रतिनिधीकोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने दिनांक १३ मे पासून १५ मे पर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही भागात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.