खेळाडू साठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न व मदत केली जाईल:विशाल परब
वेंगुर्ला (प्रतिनिधी)
वेताळेश्वर मित्रमंडळ आजगाव – भोमवार्डी आयोजित कै. वासुदेव साटेलकर, कै. रामा नारोजी आणि कै. यशवंत वेंगुर्लेकर, कै. वसंत (दादा) सातोस्कर यांच्या स्मरणार्थ भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा दिनांक. २२, २३, २४, एप्रिल कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या स्पर्धेचा शुभारंभ करत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
कोकणातील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी वी इध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यांसारख्या अनेक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत आणि आपल्या कोकणचा नावलौकिक व्हावा, हीच सदिच्छा यावेळी व्यक्त केली. प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ, क्रिकेटपटू, प्रेक्षक आदी उपस्थित होते.