सावंतवाडी प्रतिनिधी
श्री हनुमान मंदिर माजगाव खालची आळी येथे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विशाल परब यांनी उपस्थित राहून हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
श्री हनुमान सर्वांना सुख समृद्धी दीर्घायुष्य देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. बजरंग बलीच्या दर्शनाने एक प्रकारची अध्यात्मिक ऊर्जा मिळाली. यावेळी केलेला सन्मानाचा स्वीकार करून कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले.
