कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर 13 जून रोजी मतमोजणी
जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू–जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे*
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दिनांक 10 जून 2024 रोजी मतदान तर 13 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवार व राजकीय पक्षांसाठीची आदर्श आचारसंहिता दिनांक 8 मे 2024 ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच दिनांक 18 जून 2024 पर्यंतच्या कालावधीसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता लागू राहील. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे. *महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2024 कार्यक्रम पुढीलप्रमाणे*
♦️निवडणूकीची अधिसूचना 15 मे 2024 (बुधवार) रोजी प्रसिध्द होईल. नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 22 मे 2024 (बुधवार) असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक 24 मे 2024 (शुक्रवार) असा असून उमेदवारी अर्जमागे घेण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2024 (सोमवार) आहे. मतदान दिनांक 10 जून 2024 (सोमवार) होईल. मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत आहे. मतमोजणीचा दिनांक 13 जून 2024 (गुरुवार) होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 18 जून 2024 (मंगळवार) आहे.
