युवा फोरमच्या माध्यमातून साळगाव शाळेला मदत..
कुडाळ (प्रतिनिधी)
साळगावमध्ये युवा फोरम इंडिया टीमने विविध शाळांमध्ये वह्या वाटप करत असताना, साळगाव प्राथमिक शाळा क्र. १ च्या इमारतीच्या छपराची समस्या आणि दुरुस्तीची तातडीची गरज उघड झाली. शाळेच्या कर्मचारी आणि स्थानिकांनी ही समस्या युवा फोरम इंडिया सदस्य श्री. भूषण गावडे, शुभम सिंदगीकर आणि भूषण मेस्त्री यांच्या समोर मांडली. त्यांनी ही माहिती युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष अॅड. यशवर्धन जयराज राणे यांना कळवली.
राणे यांनी त्वरित कारवाई करण्याचे ठरवले आणि ६ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शाळा व्यवस्थापनास काही आर्थिक मदत दिली जेणेकरून आवश्यक दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू होऊ शकेल. शाळेच्या व्यवस्थापनाने या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी अत्यंत उत्सुकता दाखवली आहे. ग्रामपंचायत उपसरपंच श्री. पवार, युवा फोरम सदस्य वैभव पवार आणि श्री. राजेश साळगांवकर हे देखील या समस्येचे निराकरण करण्यासाठी पूर्णतः कटीबद्ध आहेत.
प्रसंगी जिल्हा प्रमुख शुभम सिंदगीकर, जिल्हा
सचिव केतन शिरोडकर, युवा फोरम सदस्य वैभवपवार, शुभम वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत उपसरपंच श्री. पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिनेश साळगांवकर आणि श्री. राजेश साळगांवकर हे उपस्थित होते.
अॅड. यशवर्धन राणे यांनी शाळेच्या समस्यांची सखोल माहिती घेतली आणि शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. यामुळे शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक अत्यंत आनंदी झाले आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाने या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
יר