संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी….*

वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला सावरले!

सावंतवाडी प्रतिनिधी
वाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कानावर पोहोचली. तातडीने या अडचणीची दखल घेत सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशाल परब यांनी रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर पूर्ण करून दिले. भाजपा कार्यकर्त्यांना आपला परिवार मानत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा लौकिक आजवर ऐकत आलो होतो, आज त्याचा अनुभव घेतला, असे भावनोत्कट उद्गार मेस्त्री कुटुंबियांनी काढले.

भाजपा नेते खासदार नारायणराव राणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विशाल परब यांची लोकहिताची चाललेली विविध कामे हा जनतेमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.लोकांना मदत करण्यासाठी सतत धावपळ करणाऱ्या, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणाऱ्या भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कामातून कार्यकर्त्यांना मिळणारी ऊर्जा म्हणजे एकुणच “सामर्थ्य असो नसो तरीही जिद्द ठेवतो जिंकण्याची..साथ असता विशालजींची झुंजही देऊ वादळाशी” अशा प्रकारची सकारात्मक झालेली दिसून येत आहे. विशाल परब यांच्या या संवेदनशील कार्याचेची वाफोली परीसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page