माजी खा.निलेश राणे: दोषींवर कारवाई होणारच,महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल
मालवण प्रतिनिधी
किल्ले राजकोट येथील छत्रपती
शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी दुःखदायक घटना आहे. महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत. त्यामुळे बोलायला शब्द नाहीत. यातील दोषींवर कारवाई होणारच. मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल. असे भाजपा नेते निलेश राणे यांनी किल्ले राजकोट येथे बोलताना सांगितले.
दरम्यान, निलेश राणे म्हणाले शिवभक्ततांच्या भावना समजू शकतो. मात्र शिवप्रेमी जनतेने संयम दाखवला. जनतेच्या भावना तीव्र आहेत. कारण हा आमच्या सर्वांच्या दैवताचा विषय आहे. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आमचाही पाठपुरावा सुरूच राहील. असेही निलेश राणे म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर
अध्यक्ष बाबा मोंडकर, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा