राजकोट संदर्भात एस.आय.टी नेमून चौकशी समिती गठीत करावी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे मागणी;ॲड:सुहास सावंत यांची माहिती

मालवण प्रतिनिधी
राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना आहे. सदर घटनेचा मराठा महासंघामार्फत निषेध करण्यात येत आहे. सदरची जागा अपवित्र झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक करावा. व जागा साफ करावी. स्वतंत्र एस. आय. टी नेमून चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने बैठकीत केली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी दिली.

सदर घटनेनंतर घडलेल्या शासकीय हालचालींवरून शासनाच्या कारभाराबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सदरची घटना घडण्यापुर्वी मालवण येथील सहाय्यक अभियंता श्रेणी -1, सार्वजनीक बांधकाम विभाग यांनी त्यांचे कार्यालयातील पत्र . 20/08/2024 च्य पत्राने कमांडर, अभिषेक कारभारी, एरीया कोस्टल सिक्युरीटी ऑफीसर, + यांना पत्र लिहून छत्रपती शिवरांच्या पुतळ्याबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यात त्यांनी सदरचा पुतळ्याची डागडुजी जुन महिन्यात करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. डागडूजी करून सुध्दा सदरचा पुतळा विद्रुप दिसत आहे, पुतळयाचे नट बोल्ड निघाल्याचे नमूद केले आहे. सदर सार्वजनीक बांधकाम अधीकारी यांनी त्यांना सदरच्या पुतळयाचे स्थापत्य बाबत जर शंका होती तर त्यांनी त्यांचे स्तरावर सदर पुतळ्याच्या संरक्षणतेबाबत तात्पुरती उपाययोजना का केली नाही. जुन महिन्यात पुतळयाची कोणती डागडूजी करण्यात आली याचा तपशील जनतेला समजणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page