दिव्या
सूर्याजी यांनी वेधले होते लक्ष
सावंतवाडी प्रतिनिधी
महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक
अभियंता विनोद पाटील यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे विनोद पाटील यांची तातडीने बदली करावी अशी मागणी केली होती. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच देखील लक्ष वेधलं होत. अखेर पाच वर्षांनंतर त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदली झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महावितरण अभियंता विनोद पाटील यांच्याबद्दल वीज वितरण ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी, दुर्लक्षामुळे होणारी वित्त व मानवी हानी, याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे स्थानिक अधिकारी हे पहाता विनोद पाटील यांची बदली करावी अशी मागणी सुर्याजी यांनी केली होती. आजवर अनेक मनुष्य बळी, प्राण्यांचे बळी त्यांच्या गलथान कारभारामुळे गेले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचेही जीवही धोक्यात आले होते. त्यामुळे अभियंतांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचही लक्ष वेधलं होत.
दरम्यान, पाच वर्षांनी अभियंता पाटील यांची बदली झाली आहे. २०१९ साली त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी वीज सेवा ग्राहकांपर्यंत सुरळीत कशा पद्धतीने देता येईल, याबाबत प्रयत्न केले. नंतरच्या काळात समस्यांबाबत त्यांचा चालढकलपणा तसेच काही विसंगत उत्तरांमुळे त्यांना राजकीय पुढारी ग्राहकांच्या रोषाला सामोरे व ‘जावे लागले. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने त्यांचा एकंदर कारभार व कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तक्रारी असूनही त्यांची येथून बदली होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर पाच वर्षांनंतर त्यांची येथून बदली झाली आहे.