वेंगुर्ला प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या आडेली गावातील प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आला. आडेली गावच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कार्यकर्ते श्री. परब यांच्या हायटेक प्रचारात उतरले आहेत. यावेळी समीर कुडाळकर, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, पप्पू धर्णे, परेश हळणकर, विशाल धर्णे, निलेश धुरी, सत्यवानकुडाळकर, समीर गडेकर, साईप्रसाद उर्फ गोट्या नाईक, साईल वराडकर, मंगेश परब, वैशाली कुडाळकर, समिधा कुडाळकर, राम कोंडस्कर, विजय कानडे, महेश धुरी, बाबा घोंगे, गंगाराम मुंड्ये, चंद्रशेखर पेडणेकर, दशरथ पेडणेकर, वसंत धर्णे, तुषार धर्णे आदींसह शेकडो कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. आडेली
गावच्या विकासात्मक बदलासाठी संपूर्ण गावातून श्री. परब यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात येईल, असे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.