कडावल-वर्दे यांना जोडणाऱ्या ब्रिजसाठी किमान ३ कोटींचा उपलब्ध करून देण्याची भाजपा नेते निलेश राणे यांची राज्य अर्थसंकल्पात मागणी.

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील कडावल बाजारपेठ ते वर्दे-ओरोस यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी अनेकवर्षापासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत कडावल ते वर्दे दरम्यान असलेला लोखंडी साकव नादुरुस्त झाला असून देखील प्रवासासाठी इतर काही पर्याय नसल्याने स्थानिकांना याच ब्रिज वरून प्रवास करावा लागत आहे. मोठ्या वाहनांसाठी मात्र पणदूर वरूनच वाहतूक करावी लागत असून यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी वर्दे, ओरोस खुर्द, कडावल, भडगाव, पांग्रड, निरुखे, आवळेगाव येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्याजवळ या ब्रिजसाठी निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार निलेश राणे यांनी राज्य अर्थसंकल्पातून ३ कोटी रुपये एवढा निधी कडावल-वर्दे यांना जोडणाऱ्या पुलासाठी देण्याची मागणी केली आहे. या पूल झाल्यास सिंधुदुर्गनगरी ते कडावल बाजारपेठ हे अंतर ८ कि.मी राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page