राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आजदुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना करावी लागली प्रतीक्षा लागली. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली…