सावंतवाडी प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता मागवण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, मंत्री दीपक केसरकर आज पासून गावागावात प्रचार सुरू करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी जिल्हा बँक संचालक महेश सारंग प्रभारी तालुकाप्रमुख गुणाजी गावडे महिला जिल्हाप्रमुख. अँड. निता सावंत नंदू शिरोडकर, गावडे आदी उपस्थित होते.