असलदे सरपंच चंद्रकांत डामरे भाजपमध्ये प्रवेश…

कणकवली प्रतिनिधी
शिवसेना उबाठा गटाचे असलदेचे सरपंच असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब यांच्यासह उबाठा सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश प्रहार भवन येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला.

सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या समवेत उबाठा सेनेचे विभागीय शाखा संघटक मनोज लोके, विजय खरात, सचिन हरमलकर, प्रवीण डगरे, हर्षद परब, विजय वरक यांच्यासह असलदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असलदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नीतेश राणेंच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे डामरे यांनी सांगितले. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, व्हा. चेअरमन दयानंद हडकर, रघुनाथ लोके, प्रशांत परब, कृष्णा वायगणकर, संतोष परब, किरण परब, संदीप नरे, महेश लोके, उदय परब, दिनेश तावडे, उपसरपंच इरफान साठविलकर, गवस साठविलकर, यासीन म्हास्के आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page