चौकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी प्रतिनिधी चौकुळ येथील धम्मस्मृती बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतरच्या अभिवादन सभेत उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले.वक्त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली आणि त्यांच्या विचारांचा आजच्या काळात कसा उपयोग होऊ शकतो…

Read More

कुडाळ-वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे वीज कोसळून गाय गतप्राण

संध्याकाळी 4 वाजताची घटना.. कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वेताळ बांबर्डे • देऊळवाडी येथील राहणारे गुणेश बांबर्डेकर यांची गाय झाडाखाली बांधून ठेवण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी ४ पासून विजांच्या जोरदार कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक जोरदार वीज गाईवर कोसळली. यात गाईचा जागीच…

Read More

अखेर” मांडवी खाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या तरंगत्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…

Read More

सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट जाहीर…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीकोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने दिनांक १३ मे पासून १५ मे पर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही भागात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Read More

महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2024 कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर 13 जून रोजी मतमोजणी जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू–जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे* सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम…

Read More

राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आजदुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना करावी लागली प्रतीक्षा लागली. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली…

Read More

माझगाव हनुमान मंदीरात आयोजित कार्यक्रमाला विशाल परबांची उपस्थिती..

सावंतवाडी प्रतिनिधीश्री हनुमान मंदिर माजगाव खालची आळी येथे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विशाल परब यांनी उपस्थित राहून हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री हनुमान सर्वांना सुख समृद्धी दीर्घायुष्य देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. बजरंग बलीच्या दर्शनाने एक प्रकारची अध्यात्मिक ऊर्जा मिळाली. यावेळी केलेला सन्मानाचा स्वीकार…

Read More

चराठा येथील नागरीक आज अक्कलकोट स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी मार्गस्थ…

युवा उद्योजक विशाल परब यांचे सौजन्य.. सावंतवाडी (प्रतिनिधी)येथील युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहे. यावेळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी प्रवासाचा शुभारंभ केला. दरम्यान स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा आशीर्वाद…

Read More

खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील

खेळाडू साठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न व मदत केली जाईल:विशाल परब वेंगुर्ला (प्रतिनिधी)वेताळेश्वर मित्रमंडळ आजगाव – भोमवार्डी आयोजित कै. वासुदेव साटेलकर, कै. रामा नारोजी आणि कै. यशवंत वेंगुर्लेकर, कै. वसंत (दादा) सातोस्कर यांच्या स्मरणार्थ भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा दिनांक. २२, २३, २४, एप्रिल कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या स्पर्धेचा शुभारंभ करत…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले ग्रामदेवतेचे दर्शन..

उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांचे मानले आभार.. कणकवली (प्रतिनिधी)भाजपचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर नारायण राणे यांनी आपल्या गावी वरवडे येथे जात ग्रामदैवत श्री देव भैरवनाथचे सपत्निक दर्शन घेतले. दरम्यान माध्यमांशी बोलताना आपल्याला भाजपची उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व महायुतीतील नेत्यांचे आभार व्यक्त केले…

Read More

You cannot copy content of this page