मालवण प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळावरुन सिंधुदुर्ग-पुणे- सिंधुदुर्ग ही विमानसेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी भाजप खासदार नारायण राणेंना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयाचे चिपी (बॅ. नाथ पै) विमानतळ सुरु होऊन सुमारे तीन वर्षे उलटली आहेत. या विमानतळावरुन गोवास्थित प्लाय ९१ या विमान कंपनीद्वारे सध्या सिंधुदुर्ग-हैद्राबाद-सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग-बंगळूर-सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गावर विमानसेवा नियमितपणे सुरु आहे. याच कंपनीद्वारे सिंधुदुर्ग-पुणे- सिंधुदुर्ग अशी विमानसेवा मे महिन्यातच सुरु होणार,
असे ऐकिवात होते. मात्र, ही सेवा अद्यापही सुरू झाली नाही. ही
बाब लक्षात घेऊन आपण तातडीने लक्ष घालून सिंधुदुर्ग-पुणे-
सिंधुदुर्ग ही विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी
मागणी केली आहे.