कुडाळ-वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे वीज कोसळून गाय गतप्राण

संध्याकाळी 4 वाजताची घटना..

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वेताळ बांबर्डे • देऊळवाडी येथील राहणारे गुणेश बांबर्डेकर यांची गाय झाडाखाली बांधून ठेवण्यात आली होती.

बुधवारी संध्याकाळी ४ पासून विजांच्या जोरदार कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक जोरदार वीज गाईवर कोसळली. यात गाईचा जागीच मृत्यू झाला. सदर गाय अडीच वर्षे वयाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page