कास पाणी प्रश्न पेटला.

नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यास हेळसांड करत असल्याने सरपंच प्रविण पंडीत यांनी ठराव घेऊन काढुन टाकले.

सरपंचाच्या कारवाईवर एका सदस्याने हरकत घेत केला विरोध.पाणी येत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थ आक्रमक.

सावंतवाडी (प्रतिनिधी)
कास भाईपवाडी गेली कित्येक वर्षे पाण्यापासुन वंचीत आहे.कोट्यावधी रूपयाचा निधी खर्च करूनही भाईपवाडीला पाणी पूरवठा नाही.नविन विहीर बांधुन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली.विद्युत पोल घालण्यात आले पंप ही बसवण्यात आले मात्र तांत्रीक अणचणीमुळे एक विद्युत पोल घालण्यास अडचण असल्याने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.संध्या जुन्या नळपाणी योजनेचे पाणी सुरू आहे.मात्र नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यात हेळसांड करत असल्याने पाणी येत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थानी ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला.ग्रामस्थाच्या अर्जावर सरपंचानी सदस्याची सभा बोलावुन अर्जाचे वाचन केल्यावर कर्मचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सर्व सभासदाच्या सहमंतीने ठराव घेऊन कर्मचार्याला कामावरून काढुन टाकण्यात आले.यावर एका सदस्याने हरकत घेत भाईपवाडी ग्रामस्थ खोट बोलतात त्याना पाणी पुरवठा होतो कर्मचार्याला काढता येणार नाही. तसेच सरपंचानी आमच्या प्रभागामध्ये येऊ नये आमच आम्ही बघु कर्मचार्याला आपल्या जबाबदारीवर ठेवण्याची जबाबदारी घेतली.यावर तोडगा काढण्यासाठी आज भाईपवाडी ग्रामस्थाना ग्रामपंचायत मध्ये बोलावुन चर्चा करण्यात आली.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागमणी केली.सदस्य,ग्रामस्थाच्या सह्या घेऊन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page