कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा…

मुंबई (प्रतिनिधी)
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार निवडीच्या जोरदार हालचाली सुरू असून राज ठाकरे यांनी आपला निर्णय पुन्हा बदलला आहे. कालच उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या नवनिर्माण पक्षाचा पाठिंबा निरंजन डावखरे यांना दिला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुक जाहीर झाली तेव्हा प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार अभिजीत पानसे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता डावखरे यांना बुस्टर मिळाला आहे असे बोलले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा होता. आता त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता डावखरे यांची बाजू मजबूत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page