भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते परुळेबाजारात कोकणी परंपरेतील नारळ लढवण्याच्या भव्य स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ
सिंधुदुर्ग प्रतिनिधीश्रावणामध्ये सुरू होणारी “नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण असते. ठिकठिकाणी होणाऱ्या या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अक्षरशः सर्वच आबालवृद्ध, महिला सहभागी होत या स्पर्धेचा आनंद लुटतात. किनारपट्टीवर वेगळाच उत्साही माहोल तयार करणाऱ्या या स्पर्धांचा नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करत सांगता समारंभ होतो. या सर्व स्पर्धांचा शुभारंभ करण्याचा मान परुळे गावाने…