आंबेरी पुलाचे अधिकृत उद्घाटन होऊन या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला होणार की नाही,जनतेला शंका..

शासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लोकात संतापाची उसळली लाट,गरज नसताना तिथे मात्र निधी खर्च,
पैशाची उधळण

स्थानिक आमदार,खासदार जिल्हात तीन मंत्री असताना पुलाची दयनीय अवस्था,पावसाळा तोंडावर आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेरी कर्ली नदीवर ब्रिटिश कालीन पूलाच्या बांधकामाचे काम गेली दोन वर्ष चालू आहे अद्याप पर्यंत वाहतुकीसाठी खुला झालेल्या नाही मात्र नेमकं घोड अडलय कुठे?कोणाच्या हट्टांपायी सामान्य जनतेला वेठीस धरले जाते असे सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.
ओव्हर फ्लो पाणी (कमी उंचीचा) फुल बांधला. पावसाळ्यात या नदीने रुद्र रूप धारण केले की माणगाव खोऱ्यातील 27 गावे उर्वरित जगापासून संपर्कहीन होत असत.मोठ्या उंचीचा व भव्य कमानीचा फुल व्हावा अशी अनेक वर्ष लोकांनी मागणी केली पण आतापर्यंत निवडणुक प्रचाराच्या काळात हा पुलाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांनी उचलून धरला आणि निकालानंतर तो पुन्हा जोरात आपटला. जनतेच्या पदरी निराशाच येत गेली.

पूल बांधून शंभर वर्ष झाल्यानंतर म्हणजेच 2005 साली पुलाचे आयुष्य संपलेले असून तो उध्वस्त करावा व त्या ठिकाणी नवीन पूल बांधावा असे पत्र आपल्या शासनाला पाठवले. म्हणजे या फुलाचे बांधकाम किती मजबूत होते हे समजते. शेवटी लोकांचा दबाव वाढत चालला याला हिरवा कंदील मिळाला. गेल्या वर्षी हा पूल बांधून पूर्ण झालेला आहे. पुल भक्कम आणि कमानीचा झालेला आहे पण त्याचे रीतसर उद्घाटन झालेले नाही. या पुलाच्या माणगावच्या बाजूने व आंबेरीच्या बाजूने काही भाग बांधकामाचा शिल्लक राहिलेला आहे. या फुलाच्या बांधकामाच्या एकूण खर्चात ही वाढीव रक्कम नव्हती म्हणून सदर बांधकाम शिल्लक राहिले असे समजले.तब्बल एक वर्ष झाले,वाट कोणाची पाहतात गरज नसताना सुद्धा अन्य ठिकाणी डांबरीकरण केले जात आहे. शासनाचा निधी उधळला जात आहे. पण या पुलाचा वाढीव खर्च का मंजूर केला गेला नाही अन मंजूर असेल तर तो खर्ची घालून का पूर्ण केला नाही असा सवाल जनता विचारत आहेत
पुलाच्या दोन्ही बाजूला तकलादू भराव टाकला आहे. संरक्षण कठडा अपूर्ण आहे.अध्याप त्या दोन्ही बाजू मुख्य रस्त्यात विलीन केलेल्या नाहीत .
गेल्या पावसाळ्यापूर्वी एप्रिल – मे दरम्यान हा पूल बांधुन पूर्ण झाला आहे.पण त्या वेळी उद्घाटनाला मुहूर्त सापडला नाही.परिणामी एस.टी .महामंडळाने
पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या नंतर नवीन पुलावरून गाड्या घालण्यास नकार दिला. खाजगी वाहन चालकांनी जीव मुठीत घेत, घाबरत घाबरत आपली वाहने नवीन पुलावरून घातली .पावसाळा संपल्यानंतर पुन्हा ब्रिटिश कालीन पुलावरून सर्व वाहतुक सुरू लोक निद्रिस्त राहिले.पण आता पावसाळा तोंडावर आला तरी सार्वजनिक बांधकाम खाते या बाबत काहीच हालचाल करायला तयार नाही.
स्थानिक आमदार खासदार जिल्हात तीन मंत्री असताना पुलाची अवस्था मात्र दयनीय आहे.मात्र नेमकं घोड अडलय तरी कुठे फक्त आपल्या श्रेयवादासाठी जनतेला वेटीस धरले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page