सावंतवाडी प्रतिनिधी
चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्याखाली सापडून जबर जखमी झाले.दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिरजे यांना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना विजन हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने मदतीसाठी आश्वासन देखील श्री.परब यांनी दिले.
यावेळी चराठा उपसरपंच अमित परब माजी पंचायत समिती सदस्य, गौरी पावसकर ,तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, संतोष कोठावळे, ओमकार पावसकर, बाळा बोंद्रे, सुरेश परब, तनवी परब, सुरेश कोठावळे, आदी उपस्थित होते.