पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत गेलेली वेंगुर्लेमधील गरीब युवती झाली जखमी

ऑपरेशनच्या खर्चासाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत

वेंगुर्ले प्रतिनिधी
पोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी मुंबईला गेलेली अणसुर गावची युवती कु.करीना लक्ष्मण गावडे ही दुर्दैवाने ट्रेनिंग करून रूमवर आल्यानंतर फॅनमध्ये अडकून तिची दोन बोटे गंभीररित्या जखमी झाली. घरची अतिशय गरिबीची परिस्थिती, त्यात जिद्दीने पोलीस दलात भरती होण्यासाठी ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईत जाऊन ती प्रशिक्षण घेत होती.अचानक झालेल्या या विचित्र अपघाताने त्या युवतीसह कुटुंबियदेखील हादरून गेले. ही घटना अणसुर गावचे सरपंच सत्यविजय गावडे यांच्यामार्फत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कानावर गेली. विशाल परब यांनी तातडीने काही आर्थिक मदत तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली.यावेळी प्रज्ञा प्रभाकर गावडे, संयमी रामचंद्र गावडे, वामन लक्ष्मण गावडे, साक्षी सतीश गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, प्रभाकर गावडे, गणेश गावडे यावेळी उपस्थित होते.

ऑपरेशनसाठी तिच्या वडीलांनी तिला मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लेझर ऑपरेशन झाल्यावर पुढच्या महिन्यांत १५ तारीखला तिला पुण्यात पुढील प्रशिक्षणासाठी जावे लागणार आहे. वेंगुर्ले येथील नागरिक तिच्या ऑपरेशनसाठी आर्थिक तरतुदीसाठी प्रयत्न करत असताना उद्योजक श्री.विशाल परब यांच्या मदतीने त्यासाठी हातभार लागला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस,तालुका सरचिटणीस बाबली वांयगणकर,मच्छीमार नेते दादा केळुसकर, सरपंच संघटना अध्यक्ष पपू परब,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायगणकर, सायमन आल्मेडा, पुंडलिक हळदणकर, मनोहर तांडेल, गौरेश खानोलकर व कार्यकर्ते या जिद्दी मुलीच्या पाठीशी उभे राहिले आहेत.तिच्या जिद्दीचे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या संवेदनशील वृत्तीचे खरोखरच कौतुक करावे लागेल. हर मैदान फतेह करण्याच्या आपल्या भूमीकन्येच्या जिद्दीला आणि संघर्षाला प्रोत्साहन देण्यासाठी विशाल परब यांच्यासारख्या संवेदनशील युवा नेतृत्वाने केलेल्या मदतीबद्दल त्या पोलीस प्रशिक्षणार्थी युवतीच्या घरातल्यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page